Baramati Crime News : अजित पवारांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला धमकावणाऱ्यास अटक

0

एमपीसीन्यूज : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तुमच्या नावाची तक्रार आली आहे’, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाला धमकावणाऱ्या एकाला बारामती पोलिसांनी अटक केली. तुषार तावरे असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तुषार तावरे याने अजय कामदार यांना फोन करून “तुमच्याविरुद्ध अजित पवारांकडे तक्रार आली आहे तुम्हाला माहिती व्हाट्सअप वर पाठवली आहे ती पहा” असे सांगितले.

या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी असा शेरा मारून पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना रिमार्क करून त्याखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही असल्याचे फिर्यादी यांना दिसले.

त्यानंतर फिर्यादी यांनी तावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्याने तुमच्या विरोधात दिलेला अर्ज मी अजूनही पोलिसांकडे पाठवलेला नाहीये. त्यामुळे दोन दिवसात तुमचे वाद मिटवून घ्या; अन्यथा तुमच्या विरुद्ध कारवाई होईल, असे सांगितले.

परंतु फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात फोन करून चौकशी केली असता त्यांना तुषार नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.