Baramati : बारामतीतून घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज : बारामती तालुक्यातील (Baramati) सांगवी गावातून एक महिला बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी या महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिच्या सोबत काही घातपात झाला याबाबत सध्या संपूर्ण बारामती तालुक्यात चर्चा सुरू आहे. सविता आप्पासाहेब सालगुडे (वय 42) असे मयत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सविता सालगुडे या बारामती तालुक्यातील सांगवी गावच्या रहिवाशी होत्या. शुक्रवारी रात्री त्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर शनिवारी एका शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या महिलेने आत्महत्या केली नसून घातपात झाला असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. सविता यांचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी संशयास्पद असलेल्या एका तरुणाला रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाचे गुड आणखीनच वाढले (Baramati) आहे. बारामती तालुका पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचे 36 वर्षांनंतर झाले स्वप्न पूर्ण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.