Baramati : आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा; शरद पवार कार्यक्रमस्थानी हजर

एमपीसी न्यूज : बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचे (Baramati) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असून शरद पवार आणि सुप्रिया सुळे हजर झाले आहेत. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मंचावर हा कार्यक्रम घेण्यात येत असून या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत.  

Alandi : वाढदिवसाचे औचित्य साधून ओळख श्री ज्ञानेश्वरीची – एक परिवार या उपक्रमासाठी पाच लाख रुपये

पाच जिल्ह्यातून युवक युवती या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. तसेच महायुती सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. तरुणांच्या रोजगारासाठी हा सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.