Baramati News : काय सांगता ! बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – बारामतीतील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या बोकडाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या ‘टायसन’ नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेळीपालक व शेळीपालक तज्ज्ञांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या बारामतीत बोकडाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे.

पारंपारिक शेळी व्यवसायात बदल करून शेतकरी तुकाराम खोमणे 2014 साली बोर जातीच्या शेळ्यांचा गोठा सुरू केला. या गोठ्यात त्यांनी हा बोकड योग्य पद्धतीने तयार केला. हा बोकड उत्तम वंशावळीचा व गुणवत्तेचा असल्याने अवघ्या चार सहा महिन्यातच खोमणे यांच्या शेळी व्यवसायाचा परिसरात बोलबाला झाला. म्हणूनच त्यांनी बोकडाचा वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय केला.

बोकडाच्या या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी खोमणे यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा पंचक्रोशीत खोमणे यांच्या टायसन बोकडाची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.