Baramati News : गाईचा गोठा साफ करणे पडले महागात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : बारामती तालुक्यातील खांडस गावात (Baramati News) गोठा साफ करत असताना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बायोगॅस टाकीतील विषारी वायू श्वसनावाटे शरीरात गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  एकाच कुटुंबातील चौघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रवीण भानुदास आटोळे (28), वडील भानुदास आनंदराव आटोळे (55), प्रकाश सोपान आटोळे (35) आणि बापूराव पिराजी गव्हाणे (55) अशी मृतांची नावे आहेत.

Pimpri News : ट्रकमधील सामान पडल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूकीची कोंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.45 च्या सुमारास ही घटना घडली. मृतांपैकी एकजण गाईचा गोठा साफ करण्यासाठी गेला होता. या गोठ्यात शेण आणि जनावरांच्या मूत्राने भरलेली ब्रिटीशकालीन टाकी आहे. त्यात त्याने प्रवेश केला. परंतु, बायोगॅस शरीरात गेल्याने तो तेथेचे बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी आणखी (Baramati News) तीन जण एकामागून एक आत घुसले असता त्यांचाही अशाच प्रकारे गुदमरून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.