Baramati News : एकनाथ खडसेंनी ‘आरपीआय’मध्ये यायला पाहिजे होते – रामदास आठवले

एमपीसीन्यूज : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली. त्यांना पक्ष बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केली.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले आज, गुरुवारी बारामतीत आले होते. त्यावेळी ते बोलत होता.

_MPC_DIR_MPU_II

खडसे म्हणाले, भाजपचे दहा-पंधरा आमदार पक्ष सोडून जातील यात काही तथ्य नाही. खडसेंकडे आमदारकी नव्हती म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांनी पक्ष बदलायचा नव्हता. जर पक्ष बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे, अशी आमची भूमिका होती.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50  हजारांची मदत हवी

आठवले म्हणाले, पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यात प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. येथील शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडूनही मदत करण्यात येईल. परंतु, सर्वात जास्त जबाबदारी राज्य सरकारची आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like