Baramati News : 70 दिवसांत बारामती परिमंडलाने बदलले 3240 रोहित्र

एमपीसी न्यूज : रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या (Baramati News) वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील 70 दिवसांत 3270 रोहित्र जळाले होते. त्यातील 3240 रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त 30 रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रुमला फोन करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

बारामती परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत. सोलापूर मंडलात 55104, सातारा 30617 व बारामती मंडलात 39225 रोहित्र आहेत. सरासरी 7.44 टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात. अनाधिकृत वीज भार, कॅपॅसिटरचा वापर टाळणे ही रोहित्र जळण्याचे प्रमुख कारणे आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात.

गेल्या डिसेंबरपासून फेब्रुवारीच्या 8 तारखेपर्यंत (70 दिवस) परिमंडलात सोलापूर 1663, सातारा 576 तर बारामती मंडलात 1031 अशी एकूण 3270 रोहित्र जळाली आहेत. यातील केवळ 30 रोहित्र बदलणे बाकी आहे. जळालेले रोहित्र तातडीने बदण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहीत्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) फोन करावा.

जेणेकरुन संबंधित रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे (Baramati News) क्रमांक सोलापूरसाठी 9029140455, सातारा 9029168554 व बारामती करिता 7875768074 असे आहेत. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील.

कॅपॅसिटरचा वापर करा –

रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

Pune News : संकष्टी निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.