Baramati News : पतीच्या खून प्रकरणी पत्नीला जन्मठेप

एमपीसी न्यूज : पतीचा दगडाने ठेचून (Baramati News) व विळ्याने वार करून खून केल्याच्या प्रकरणात शोभा इंगळे (रा. खुटबाव, ता. दौंड) या आरोपी पत्नीला बारामती तालुका कोर्टातील न्यायाधीश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे 23 ऑगस्ट 2015 रोजी अनिल इंगळे यांचा खून झाला होता. अनिल इंगळे व शोभा इंगळे या पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. याच कारणावरून शोभा हिने तिच्या पतीच्या डोक्यात दगड घातला तसेच विळ्याने वार करत पतीचा खून केला होता.

मयताचे भाऊ सुनील इंगळे यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शोभा हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी आर. के. गवळी यांनी या खूनाचा तपास करत आरोपी महिलेविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून 10 साक्षीदार तपासण्यात (Baramati News) आले. विशेष सरकारी वकील सुनील वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भा. द. वि कलम 302 अन्वये आरोपी शोभा हिला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी काम पाहिले. सहाय्यक उप पोलीस निरीक्षक एन ए नलावडे, पोलीस नाईक विनोद ढोपरे यांनी सहकार्य केले.

Pune Police : ‘चलो बैठो घुमने जाते है’ म्हणत तरुणींची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल, वाचा काय केलं?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.