Baramati News : शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘एक मराठा, लाख मराठा’ संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण

एमपीसी न्यूज:  बारामती येथील गोविंद बाग येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच ‘एक मराठा, लाख मराठा’ या संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्याचे ध्येय व राज्यातील सर्व गडकोट किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे, अशी उद्दिष्टे ठेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक मराठा, लाख मराठा’ ही संस्था काम करणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रतिक पवार यांनी केले आहे.

यावेळेस अध्यक्ष विक्रांत पवार, संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य युवराज दाखले, सचिन लिमकर, संजय माने, सुनिल सोनवणे, आकाश शेवाळे, स्वप्निल गाडे, वेदांत जाधव, प्रा. काशीनाथ आल्हाट, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व थरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र अशा ठिकाणी स्थान मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीस उत्तेजन देणे, समाजाच्या उन्नती व कल्याणासाठी काम करणे तसेच बाराबलुतेदार समाजातील घटकांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संस्था काम करणार आहे. संस्थेत काम करण्यासाठी राज्यातील उद्योजक, युवक, युवतींनी संपर्क साधावा, असे अवाहन युवराज दाखले यांनी यावेळेस केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.