Baramati : कळशी आणि हंड्यांमध्ये लपवलेला एक लाखाचा गांजा जप्त

One lakh cannabis hidden in pots and pans seized:अनंतनगर परिसरातील गारुडी गल्लीत हा गांजा विकला जात होता

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील अनंतनगर येथील एक गल्लीत गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एका घरातून कळशी आणि हंड्यांमध्ये जपून ठेवलेला एक लाख रुपये 3 किलो 225 ग्रॅम गांजा जप्त केला.

याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात तिघांविरोधात एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंतनगर परिसरातील गारुडी गल्लीत हा गांजा विकला जात होता. पोलिसांनी  छापा टाकला तेव्हा येथील एका घरामध्ये पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याच्या कळशी हंडा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत हा गांजा लपवून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले, तर अन्य दोघेजण पळून गेले.

बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like