BNR-HDR-TOP-Mobile

Baramati : राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी बारामतीमध्ये केले मतदान

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज (मंगळवारी) बारामतीमधील काटेवाडीगावात मतदान केले. मावळ मतदारसंघातील प्रचारातून वेळ काढून बारामतीला जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्का बजाविला आहे.

महाराष्ट्रातील तिस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान होत आहे. बारामतीमधून पार्थ यांच्या आत्या सुप्रिया सुळे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीच्या कांचन कुल आहेत. पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवित आहेत. परंतु, त्यांचे मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. त्यानुसार पार्थ यांनी आज बारामतीमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला.

मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले, ”महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससाठी वातावरण चांगले आहे. वातारण बदलले आहे. सुप्रियाताईंना मोठे मताधिक्य मिळेल असा मला विश्वास आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील सर्वंच सदस्य प्रचारात उतरले नाहीत. सर्वत्र राज्यभरातील उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. मावळ मतदारसंघात देखील वातावरण चांगले आहे. विरोधक क्षुल्लक कारणांवरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. तगडा उमेदवार असल्यानेच टार्गेट केले जाते. मावळातून आपण एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येऊ” असा विश्वासही पार्थ यांनी यावेळी व्यक्त केला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3