Baramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक

Baramati: Police raid on playing card club, 33 person arrested घटनास्थळावरून पोलिसांनी 7 दुचाकी, 1 चारचाकी आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल 9 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

एमपीसी न्यूज- पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पत्ते खेळणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सात वाहनांसह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राजरोसपणे पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून माळेगाव येथील रमाबाई नगर परिसरात पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला. यावेळी पत्ते खेळताना त्या ठिकाणी 33 जण आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

घटनास्थळावरून पोलिसांनी 7 दुचाकी, 1 चारचाकी आणि जुगाराचे साहित्य असा तब्बल 9 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या आरोपींविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like