एमपीसी न्यूज : डेंग्यूने आजारी असलेल्या एका महिला पोलिसाचा (Baramati Police) उपचारादरम्यान मृत्यू झाला. शितल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात त्या कार्यरत होत्या. पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका बाळाला जन्म दिला होता. त्यांच्या निधनाने हे दहा दिवसाचं चिमुरडे पोरके झाले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मागील काही महिन्यांपासून शितल या प्रसुती रजेवर होत्या. दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्मही दिला. यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

तुमच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसांपूर्वी जन्मलेले (Baramati Police) बाळ असा परिवार आहे. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Zomato delivery boy : जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग