Baramati: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार, तरुणावर गुन्हा दाखल

Baramati: Rape of a young woman by showing the lure of marriage, filing a case against a young man

एमपीसी न्यूज- एका 20 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरोधात तर फिर्यादी मुलीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्या तरुणाच्या आई विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बारामती शहराजवळील गोजुबावी या ठिकाणी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत मामाच्या घरी आणि वेगवेगळ्या लॉजवर नेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. 28 मार्च ते 11 जुलै या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

दरम्यान, पीडित युवतीने लग्नाचा विषय काढल्यानंतर या तरुणाच्या आईने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने बारामती तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार बारामती तालुका पोलिसात आरोपीविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.