Baramati Sex Racket News : बंद कंपनीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

एमपीसीन्यूज : बारामती एमआयडीसीत एका बंद पडलेल्या कंपनीत सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या ठिकाणाहून पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेची सुटका केली आहे.

दीपक अर्जुन नाळे (वय 45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात अनैतिक प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती एमआयडीसीतील बंद पडलेल्या एका कंपनीच्या इमारतीत सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती बारामती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि एका बनावट ग्राहकाला दोन हजार रुपये देऊन या बंद पडलेल्या कंपनीत पाठवले. हा बनावट ग्राहक बोलणी करत असताना इतर पोलिसांनी याठिकाणी छापा मारला आणि आरोपीला अटक केली.

पोलिसांनी याठिकाणाहून एका महिलेचीही सुटका केली आहे. तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत आरोपीने पैशाचे आमिष दाखवून याठिकाणी आणले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तिने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.