Baramati: संतापजनक! पैशांसाठी सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला काढलं घराबाहेर!

Baramati: What to say to these in-laws, six month pregnant daughter-in-law was kicked out of the house for money. 'तुला दुसरीही मुलगी झाली, या घरात राहायचे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये' असे म्हणतात पतीने तिचा मानसिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

एमपीसी न्यूज – माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी सासू-सासर्‍यांनीच सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला घरातून बाहेर काढले. 24 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून पती आणि सासू-सासरे यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सहा महिन्याची गर्भवती असताना तिच्या सासू-सासर्‍यांनी शिवीगाळ करीत तिला घराबाहेर काढले. फिर्यादी महिलेला दोन मुली आहेत त्या कारणावरून हे तिच्या पतीने तिचा छळ केला. ‘तुला दुसरीही मुलगी झाली, या घरात राहायचे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणतात पतीने तिचा मानसिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच वेळोवेळी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी तिला मारहाणही केली. तर घरात परत आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक घोलप करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.