Baramati : व्हाट्सएप ग्रुपमधून बाहेर पडल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – व्हाट्सएप ग्रुपमधून बाहेर पडलेल्या तरुणावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात उघडकीस आली.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो एवढेच नाही तर सोशल मीडिया आता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनलेला आहे. प्रत्यक्षात भेटण्या बोलण्यापेक्षा आता सोशल मीडिया द्वारे लोक एकमेकांशी संपर्क साधताना पाहायला मिळतात.

सोशल मीडियावर होणाऱ्या वादातून झालेल्या विविध गुन्ह्यांचे प्रमाणही त्यामुळे वाढत चालले आहे. व्हाट्सएप ग्रुपमधून बाहेर पडल्याच्या कारणावरून चिडलेल्या काही तरुणांनी एकाला लाथा बुक्क्यांनी तसेच शरीरावर तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले आहे. ही घटना निमगाव केतकी मधील पान बाजारात घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.