Bhosari : बारी समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहणार – महेश लांडगे

भोसरीत बारी समाज विकास मंच पिंपरी-चिंचवड शाखेचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – शेतकरी ते उद्योग अशी बारी समाजाची वाटचाल सूरू आहे. खान्देश, विदर्भातून हा समाज रोजगारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण परिसरात आला आहे. शहराच्या विकासासाठी बारी समाजाचे योगदार असून या समाजाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील बारी समाजाचा कौटुंबिक वार्षिक स्नेहमेळावा दि. 13 ऑक्टोबर रोजी भोसरी येथील कृष्ण इंदुबन मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी, महेश लांडगे बोलत होते. याप्रसंगी, पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव, कार्तिक लांडगे, पूजा लांडगे, गुजरात मठुआ (भावनगर) जनरल सेक्रेटरी नरेंद्रभाई मोरी, पिंपरी- चिंचवड भाजपाचे शरद बोर्‍हाडे, उद्योजक प्रसाद कुलकर्णी, बारी समाज विकास मंचचे अध्यक्ष ओंकार काटोले, डॉ. अतुल कोल्हे, शिक्षणाधिकारी सुरेश राऊत, सुरेश बोडखे, संजय बारी, अनंत काळपांडे, कर्नल बी.के.भोंडे, विदर्भ बारी मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, वसंतराव नागेश, गायत्री स्कूलच्या संचालिका कविता पाटील, सुयोग फाऊंडेशनच्या वैशाली अस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.

दरम्यान, बारी समाजातील 150 हून अधिक ज्युनिअर केजी ते पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान कतोरे यांनी केले. गेली 25 वर्षे समाजाला जोडण्याचे काम या स्नेहमेळाव्यातून करीत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभेच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याने सांगितले.

तसेच, समाज एकत्र आल्याने समाजाचा विकास होऊन राष्ट्राच्या विकासाला हातभार लागतो, असेही नमूद केले. डॉ. अतुल कोल्हे यांनी देखील समाजाच्या गरजा व समाजाची भूमिका यावर विचार व्यक्त केले. वैशाली अस्वार, वंदना शिनकर, पल्लवी कोल्हे, वैशाली शिनकर यांनी गणेश वंदना व सरस्वती वंदना सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन समाधान कतोरे, मोहन बोडखे, मनोहर पवार, राजेश काळपांडे, सुरेश अस्वार, योगेश ढगे, विठ्ठल कपले, संतोष ढगे, दिनेश रौंदळे, संदीप हिस्सल, ज्ञानेश्‍वर घोलप यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी भरत बारी यांनी केले. तर आभार ओंकार काटोले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.