Barmati News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पवार कुटुंबियांचा भेटीगाठींचा कार्यक्रम होणार नाही

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. राज्यातील जनतेने पाडव्याच्या दिवशी भेटीसाठी बारामतीत येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातून लोक शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी करतात. यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असे आवाहन पवार कुटुंबियानी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.