Pune : स्वातंत्र्यदिनानिमित्त ओऍसिस हेल्थ सेंटर आयोजित रक्तदान शिबिरात बॅचलर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – स्वांतत्र्यादिनाचे औचित्य साधत ओऍसिस इन्स्टि ऑफ हेल्थ सायन्स रिसर्च सेन्टर या संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात बॅचलर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला. पुण्यातील बिबेवाडी येथील संस्थेच्या ठिकाणी सकाळी 9.00 वाजता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी संस्थेच्या संचालिका डॉक्टर पूजा कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह संस्थेचे अनेक सहकारी डॉक्टर उपस्थित होते.

गेल्या १३ वर्षांपासून ओऍसिस इन्स्टिटूत्व ऑफ हेल्थ सायन्स रिसर्च सेन्टरच्या वतीने अनेक कार्यक्रम समाजात रावबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरात बॅचलर मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. जवळपास ३० ते ४० विद्यार्थ्यांनी शिबिरात रक्तदान केले.

यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. पूजा कदम म्हणाल्या, दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. यामुळे अनेकाचे प्राण वाचू शकतात. यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त हा संकल्प आम्ही राबविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.