Pune :  झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी बनवली बॅटमोबिल टम्बलर कार

एमपीसी न्यूज – झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी सुपरहिरो बॅटमॅन चित्रपटातील संकल्पना असलेली बॅटमोबिल टम्बलर कारची निर्मिती केली आहे. या कारबाबत तरुणांना विशेष आकर्षण आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील क्लिष्ट यंत्रणा वापरून ही कार बनवण्यात आली आहे. भारतात हॅण्डमेड प्रकारात बनवलेली ही पहिलीच बॅटमोबिल कार आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. अमोल उबाळे, प्राध्यापक प्रवीण परीट, सुहास सावंत, महेंद्र कल्याणशेट्टी, सुशील कांबळे, प्रवीण लेंडवे, राजेंद्र भोसले, शरद घाडगे, नितीन थिटे, हरिदास लेंडवे यांनी आणि विद्यार्थी सिद्धेश शिंदे, शुभम कुदळे, विवेक गुरव, वेदांत जगताप या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला.

तसेच यामध्ये एक्सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इनव्हर्टेड हब सिस्टिमचा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ 3.5 लाख रुपये किमतीत या बॅटमोबिल कारची निर्मिती करण्यात आली आहे.

या बॅटमोबिल कारचा वेग ताशी  किलोमीटर असून लो ग्राऊंड क्लिअरन्समुळे अँटिरोल इफेक्ट मिळतो. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये वापरण्यात आलेली सस्पेंशन अव्वल दर्जाची असून व्हेईकल व्हिजन सिस्टिमसारखी पेंटटेड टेकनॉलॉजी वापरण्यात आली आहे. डॅशबोर्डवर नाईट व्हिजन कॅमेराद्वारे घेतलेले चित्रण व्हेईकल व्हिजन सिस्टिममध्ये रात्रीच्या वेळेला ड्रायव्हरची प्रखर प्रकाशामुळे होणा-या त्रासापासून आणि अपघातांपासून सुटका करते.

या कार निर्मिती प्रकल्पाला संस्थेचे सचिव प्रा. जयेश काटकर, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे, प्राचार्य डॉ. अजित काटे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.