Pune News : कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात बॅटरी ऑपरेटर मोनोरेल

एमपीसी न्यूज – बाल चमूंचे विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या प्रकल्पात 72 व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनो रेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी 410 आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कलकत्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे 5 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.