Baur : बाळासाहेब शिंदे यांना ‘कामगार भूषण’ पुरस्कार

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील कामगार नेते व बऊर मावळ येथील वेंकीज कंपनीतील युनियन लीडर बाळासाहेब नारायण शिंदे यांना वेंकीज कामगार बंधू भगिनींच्या वतीने कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘ कामगार भूषण ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिंदे यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बऊर येथे हा पुरस्कार देण्यात आला. 

याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत शेटे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, तळेगाव शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनीता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, सरपंच सदाशिव शेंडगे, मारूती वाळुंज, बबनराव शिंदे, विजय भवार, उपाध्यक्ष  जयराम वायभट आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक वेंकीज कामगार प्रतिनिधी हनुमंत खिरीड यांनी केले. मारूती कंधारे, चंद्रकांत विराट, बबन येवले, पांडुरंग ढोरे, जयराम मोहोळ, संपत वाळुंज आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.