Bavdhan : गडचिरोली येथील भाजप नेत्यांच्या मुलीची पुण्यात आत्महत्या

एमपीसी न्यूज : गडचिरोली येथील भारतीय जनता पक्षाचे नेते वासुदेव बट्टे आणि माजी नगरसेविका वर्षा बट्टे यांच्या मुलीने पुण्यामध्ये राहत्या घरी (Bavdhan) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायली वासुदेव बट्टे असे 24 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती संगणक अभियंता होती.

सायलीने शनिवारी बावधन परिसरातील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सायली गेल्या वर्षभरापासून नोकरी निमित्त पुण्यात राहत होती.

ती पुण्यात एकटीच राहात होती. तिने हे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. तिच्याकडे राहणारा तिचा भाऊ नुकताच गडचिरोलीला (Bavdhan) परतला होता. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पुण्याकडे धाव घेतली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (पिंपरी चिंचवड पोलीस) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.