Bavdhan : डोळयात मिरचीपूड टाकून तरुणास 34 हजारास लुटले

एमपीसी न्यूज- डोळयात मिरचीपूड टाकून तीन चोरट्यांनी एका तरुणास 34 हजारास लुटले. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बावधन येथे घडली.

गौतम गंगाधर लोणे (वय 32, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 8) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गौतम लोणे हे ओंकार ब्रीज, बावधन येथून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याकडील 30 हजार रुपयांची रोकड, चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि इतर कागदपत्र असा एकूण 34 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.