BavdhanKhurd: बनावट चावीद्व्यारे चोरटयांनी अडीच लाखाचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज- फ्लॅटची बनावट चावी बनवून चोरटयांनी अडीच लाखांचे दागिने लंपास केले. बावधन खुर्द परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली असून सोमवारी (दि.२५) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अरिंदम अभिजित रायचौधरी (वय ३६, रा.सनविंड सोसायटी, बावधन खुर्द) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेली माहित अशी, रायचौधरी यांचा फ्लॅट १९ मार्च ते २४ मार्च दरम्यान बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटातील सुमारे २ लाख ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास रायचौधरी घरी आले असता त्यांना चोरीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक एम.एम.पगारे याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.