Bavdhan: ट्रकच्या धडकेत मोटारचालक ठार

Motorist killed in truck crash

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटार चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर, त्याचा मामा जखमी झाला. ही घटना देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर शुक्रवारी (दि.19) बावधन बुद्रुक येथे घडली.

लिबीन मॅथ्यू असे मृत्यूमुखी पडलेल्या मोटार चालकाचे नाव आहे. जॉर्ज फिलीप (वय 63, रा. केरळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी जॉर्ज व त्यांच्या बहिणीचा मुलगा लिबीन मॅथ्यू हे मोटारीतून जात होते. मॅथ्यू गाडी चालवित होता. बावधन बुद्रुक येथे राम नदी पुलावर पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने मॅथ्यूचा मृत्यू झाला.

तर, जॉर्ज हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like