Bavdhan Rape Case : बलात्कार प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज : हिंजवडी पोलिसांनी बावधनमधील (Bavdhan Rape Case) एकास बलात्कार प्रकरणी अटक केले. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अभिनव शान्डेल्य (वय 31 वर्षे, रा. न्याती अपार्टमेन्ट, बावधन; मूळ रा. बिहार) यास पोलिसांनी अटक केली आहे.

Aslam Bagwan : सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान यांना मारहाण

फिर्यादी व आरोपी बावधनमधील एका आय टी कंपनीमध्ये काम करत असल्याने ओळख झाली. आरोपी हा फिर्यादीचा सिनियर आहे. त्याने फिर्यादीस त्याच्या राहत्या घरी बावधनमध्ये 6 जूनला जेवणासाठी रात्री 9.45 वा. बोलावले व व्हिस्की ड्रिंक पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. 10 जूनला पुन्हा फोन करून बोलावले. फिर्यादीने नकार दिला असता, आली नाहीस, तर फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. त्यामुळे दबावाखाली पुन्हा एकदा त्याने जबरदस्तीने त्याचार केला. त्याने पुन्हा फिर्यादीस 25 जूनला असता, फिर्यादीने फिर्याद दाखल केली. आरोपी विरोधात भा. द. वि कलम 376(2)(एन), 354(अ)(ड), 328 अंतर्गत (Bavdhan Rape Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.