Bavdhan : चोर समजून तिघांनी केली तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज : बावधनमध्ये (Bavdhan) तीन जणांनी एका तरुणावर चोर समजून हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत गंभीर जखमी झालेल्या तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे, निलेश शेलार. त्याचे वय 19 वर्षे आहे. तीन अनोळखी इसमांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 326, 323, 34, आर्म ऍक्ट 4(25)(27) महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37(1) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गंगा लिजंड सोसायटी शेजारी लेबर कॅम्प, बावधन येथे फिर्यादी त्याचा मित्र ऋतिक याचा वाढदिवस साजरा करत होता. फिर्यादी त्याच्या मित्राला तोंडाला केक लावण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत लेबर कॅम्पमध्ये गेला.

Pavna River : पवना नदीत वेस्ट चिकन, मटन टाकण्यासाठी आलेल्या एकाला रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल

फिर्यादीला चोर समजून अनोळखी तीन इसमांपैकी एकाने फिर्यादीच्या कपाळावर उजव्या डोळयाच्या वर लाकडी दांडका मारल्याने फिर्यादी खाली (Bavdhan) पडला. त्यांनतर तिघांनी मिळून फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्यातील एका इसमाने फिर्यादीच्या डोक्यात धारदार हत्याराने मागील बाजूस मारून त्याला गंभीर जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.