Bavdhan : कापड दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडले

एमपीसी न्यूज – कापड दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरली. त्यानंतर इतर माल चोरी करताना चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी बावधन येथे घडली.

नरेश जसाराम चौधरी (वय 31, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिल उर्फ गणी उर्फ मोहींदर लक्ष्मण कडावत (वय 22), धवन किशोर चौधरी, रोहित किशोर चौधरी (सर्व रा. स्वारगेट, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील हे त्यांच्या बावधन येथील पवन कलेक्शन नावाच्या दुकानात एकटे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच त्यांची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरली. त्यानंतर इतर माल चोरण्याचा प्रयत्न करून पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना आरोपींना फिर्यादी यांनी लोकांच्या मदतीने पकडले. आरोपी नरेश चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.