Bawdhan Crime News : एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज – एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे (Bawdhan Crime News) सांगून फोनवरील व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीस त्यांचे वीजबिल थकले असल्याचे सांगितले. वृद्धास मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याआधारे 95 हजार 700 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 16) सकाळी रामनगर कॉलनी, बावधन येथे घडली.

 

 

सुहास रामचंद्र गगनग्रास (वय 63, रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार यादव नाव सांगणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Bhosari Crime News : टेलिग्राम वरून पावणे तीन लाखांची फसवणूक

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तो एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचे वीजबिल थकले आहे. रात्री साडेनऊ पर्यंत वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगून फिर्यादीस एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक (Bawdhan Crime News) खात्यावरून 95 हजार 700 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.