Bawdhan Crime News : बावधन मध्ये पीएमपी बसची तोडफोड, तिघांना अटक

एमपीसी न्यूज –   तिघांनी रविवारी (दि. 19) दुपारी चार वाजताच्या सुमारास (Bawdhan Crime News) बावधन येथे पीएमपी बस अडवली. बसची आणि बसच्या पुढे असलेल्या एका कारची तोडफोड करून बसमधील प्रवाशांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

रामा रेड्डी मेघावत (वय 24, रा. पाषाण, पुणे), अजय नेहरू राठोड (वय 22, रा. कुलाबा मुंबई), पवन अंबादास मगर (वय 22, रा. पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बस चालक योगेश बोरसे (वय 31) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

PCMC : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम आता  एजंटमार्फत

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस घेऊन बावधन येथून जात असताना तिघांनी त्यांची बस अडवली. त्यानंतर बस आणि बससमोर असलेल्या एका कारची तोडफोड करून नुकसान केले. तिघांनी बसमधील प्रवाशांना धमकावून फिर्यादी आणि बस वाहक यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत (Bawdhan Crime News) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.