Bopodi : मच्छर अगरबत्तीचे वाटप; भीम आर्मीचे अनोखे आंदोलन

मुळा नदीपात्रातील जलपर्णीकडे वेधले लक्ष

एमपीसी न्यूज – मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे दापोडी, बोपोडी परिसरातील नागरिकांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मी बोपोडी शाखा संघटनेच्या वतीने नुकतेच नागरिकांना मोफत मच्छर अगरबत्तीचे वाटप करत गांधीगिरी केली.

_MPC_DIR_MPU_II

मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार दाद मागण्यात आली. परंतु, जलपर्णी हटविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धुरीकरण देखील केले जात नाही. परिणामी डासांचा उपद्रव वाढला असून सायंकाळनंतर नागरिकांना मोकळा श्‍वास घेणे देखील मुश्‍किल झाले आहे. मलेरिया, हिवताप सारख्या अनेक आजारांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.

महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीय कारभाराचा निषेध करीत मच्छर अगरबत्तीचे नागरिकांना वाटप करण्यात आले. संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ व शिवाजीनगर मतदार संघ प्रमुख गौतम कोटे यांच्या नेतृत्वाखालील या अभिनव आंदोलनात संघटनेचे प्रकाश म्हस्के,  श्रीकांत मनोहर, संदीप शेंडगे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.