Yuvraj On BCCI : ‘बीसीसीआय’ने मला सन्मानाची वागणूक दिली नाही – युवराज सिंग

मी स्वतःला लिजंड्स मानत नाही. क्रिकेट प्रामाणिकपणे खेळलो. पण कसोटी सामने अधिक खेळू शकलो नाही.

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय संघासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने योग्य सन्मान द्यायला हवा. जर मला निवृत्तीवेळी थोडाफार सन्मान मिळाला असता तर आनंद झाला असता, असे सांगत कारकिर्दीचा शेवट निराशाजनक झाली, असे युवीने म्हटले आहे.

युवराज सिंग यांने स्पोर्ट्सकीडाच्या ‘फ्री हिट’ या कार्यक्रमात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तो म्हणाला की, मी स्वतःला लिजंड्स मानत नाही. क्रिकेट प्रामाणिकपणे खेळलो. पण कसोटी सामने अधिक खेळू शकलो नाही.

ज्यांचे कसोटीत रेकॉर्ड चांगले आहे, त्यांचा समावेश लिजंड्स क्रिकेटर्सच्या यादीत होतो. फेअरवेल देण्याचा निर्णय हा खेळाडूला नाही तर बीसीसीआयने घ्यावा लागतो, असे सांगत त्याने क्रिकेटच्या मैदानात बहुमूल्य योगदान देणाऱ्या क्रिकेटर्सला भविष्यात तरी सन्मान द्यावा, असा टोला बीसीसीआयला लगावला.

गौतम गंभीर दोन वेळा विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. सुनील गावसकर यांच्यानंतर सेहवागने कसोटीत आपल्याला अनेक सामने जिंकून दिले.

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि झहीर खान यांचेही भारतीय संघात मोठे योगदान आहे. त्यांना योग्य सन्मान मिळाला नसल्याने माझ्याबाबतीत घडलेला प्रकार मला नवा वाटला नाही, अशा शब्दांत त्याने मनातील खदखद व्यक्त केली.

2011 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेता ठरवण्यामागे युवराज सिंगने मोलाचा वाटा उचलला होता. त्याने यावेळी मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.

2007 च्या विश्वचषकातही त्याने लक्षवेधी खेळ केली होती. यावेळी त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता. युवराज सिंगने जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.