Pune News : बिडी कामगारांना न्याय द्यावा – भारतीय मजदूर संघ 

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना प्रतिबंधीत आदेशाचे चुकीचे अर्थ बिडी ऊद्योगजकांना लावण्यात आले. त्यामुळे पुण्यातील पाच हजार पेक्षा जास्त महिला बिडी कामगारांवर ऊपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. 

मागील दोन महिन्यांपासून बंद असलेले बिडी कारखाने त्वरित पुर्ववत सुरू करण्याची मागणी भारतीय मजदूर संघाने पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. बीडी कामगांरांना लाॅकडाऊन कालावधीत मदत न मिळाल्याने अल्प उत्पन्न गटातील बिडी कामगारांचे जगणं अवघड झाले आहे. बिडी वळण्याचे काम प्रामुख्याने महिला कामगार व घरातुनच चालत असल्याने त्यांना काम मिळणे आवश्यक आहे.

येत्या दोन दिवसात बिडी कामगारांना काम न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय बीडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, कंत्राटी कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.