Cyber Alert : सावधान ! नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका 

एमपीसी न्यूज – नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमच्या नावाने व्हायरल होणा-या लिंक चुकूनही ओपन करू नका. सायबर हॅकर्सनी अशा प्रकारच्या फेक लिंक तयार केल्या असून ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल मधील वैयक्तिक डेटा, संपर्क क्रमांक तसेच इतर गोपनीय माहिती सायबर हॅकर्स पर्यंत पोहचू शकते, त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक देखील होवू शकते. 

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमच्या नावाने लिंक व्हायरल केल्या जात आहेत. व्हायरल मेसेज मध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमच्या वेब सिरिज, फिल्म, शो तसेच आयपीएल सामने मोफत पाहण्याचे आमिष दाखविले जात आहे. त्यासाठी मोबाईल ऍप डॉऊनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आली असून, या लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन सायबर विभागाने केलं आहे.
_MPC_DIR_MPU_II

सायबर हॅकर्सनी अशा प्रकारच्या फेक लिंक तयार केल्या असून ह्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्या मोबाईल मधील वैयक्तिक डेटा, संपर्क क्रमांक तसेच इतर गोपनीय माहिती सायबर हॅकर्स पर्यंत पोहचू शकते, त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक देखील होवू शकते. त्यामुळे चुकूनही या लिंक ओपन करू नका असे आवाहन पोलीस सायबर विभागाने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.