Third Wave of Corona: सावधान ! देशात ऑक्टोबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट ! शास्त्रज्ञांचा दावा

एमपीसी न्यूज : देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, गेल्या ७ दिवसात आयआयटी कानपूरने देशाच्या विविध भागातील कोरोना व्हायरसवर मॅथमेटिकल स्टडी केला आहे. केलेल्या या अभ्यासाच्या आधारावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरसने देशात कहर केला होता. मात्र आता कोरोनाचा कहर कमी होताना दिसतेय. यासाठी आयआयटी कानपूर (IIT KANPUR) येथील शास्त्रज्ञांनी गणिताच्या मॉडेलचे सूत्र वापरले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा कहर आता शिगेला पोहोचला आहे, असा शास्त्रज्ञांचा दावाही आहे. यासह देशात ऑक्टोबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. आता उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसेल तर ठराविक कालावधीनंतर ते आकडे कमी होताना दिसतील.

दुसरी लाट जुलैमध्ये संपणार

आयआयटीच्या अभ्यासानुसार, कोरोनाचा कहर सातत्याने असाच सुरू राहिला तर उत्तर प्रदेशात दररोज ३५ हजार, दिल्लीत ३० हजार, पश्चिम बंगालमध्ये ११ हजार, राजस्थानात १० हजार आणि बिहारमध्ये ९ हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येऊ शकते. कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची दुसरी लाट जुलैमध्ये संपेल तर कोरोनाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर असे समोर आले की, ऑक्टोबरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू होईल. या अभ्यासामध्ये कोरोनाची तिसरी लाट किती मोठी आणि भयानक असेल याचे विश्लेषण त्यांनी या अभ्यासात केलेले नाही.

देशाने तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हावे

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करायचा असेल तर त्याचे अनेक मार्ग आहेत, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. यासाठी देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची लस द्यावी. यासोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास केला गेला पाहिजे. देशात कोरोनाचं ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.