Mumbai: बनावट पासपोर्ट पासून सावध!, महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

Be cautious about fake passports makers on dark net says Maharashtra police cyber cell. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की, सावध रहा ! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका .

एमपीसी न्यूज – सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहे. तेव्हा अशा बनावट पासपोर्टपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सायबर भामटे हे अशा टेम्लेट्स विकत घेतात. त्याला मॉडिफाय करून बनावट पासपोर्ट बनवतात. त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत.

सावध रहा!

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की, सावध रहा ! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका . तुमच्या पासपोर्टच्या scan copies ना पासवर्ड देऊन सुरक्षित करा ज्यामुळे तुमच्या शिवाय अन्य कोणाला ती फाईल open करता येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल तर त्या प्रतीवर निळ्या पेनाच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा . तसेच खालील काही मुद्दे हे आपल्याला खोट्या व खऱ्या पासपोर्टचा फरक समजण्यास उपयोगी होतील :

१) पासपोर्टच्या issuing date व expiry date मध्ये १० वर्षाचा फरक असला पाहिजे .

२) पासपोर्टला  ३६ किंवा ६० पाने असली पाहिजेत

३) font ची size आणि alignment एकसारखी असली पाहिजे .

_MPC_DIR_MPU_II

४) पासपोर्ट वरील भारताचा emblem नीट तपासून बघा.

५) पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पण पासपोर्ट क्रमांक perforated स्वरूपात असला पाहिजे

६) जर जुना पासपोर्ट पण उपलब्ध असल्यास त्यावरील अन्य माहिती जसे की आई वडिलांचे व आपल्या जोडीदाराचे नाव नवीन व जुन्या पासपोर्टवर एकच असले पाहिजे.

७) जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर पण क्र ३ ते ३४ वर भारताचा emblem (अशोक स्तंभ ) असला पाहिजे.

जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्यांची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.