Pimpri : फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून हॉटेल चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – फ्लेक्‍स लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात 25 जणांच्या टोळक्‍याने हॉटेलमध्ये घुसून चालकाला मारहाण केली. ही घटना नेहरूनगर, पिंपरी येथे शनिवारी (ता. 27) रात्री घडली.

याकूब सुलतान शेख (वय 48, रा. नूर मोहल्ला, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूब यांचे नेहरूनगर येथे हैद्राबादी बिर्याणी नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास या हॉटेलच्या समोर फलक लावण्यासाठी काही तरुण आले. मात्र शेख यांनी त्यास हरकत घेतली. या कारणावरून 20 ते 25 जणांच्या टोळक्‍याने हॉटेलमध्ये घुसून फिर्यादी याकूब व त्यांचे मेहुणे यांना मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.