Chakan : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यू – क्रिकेट खेळताना रागाने बघितल्याचा कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल गार्डन चाकण येथे घडली.

हतेश हनुमंत कड (वय 17, रा. विशाल गार्डन, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखिल प्रदीप राऊत, अमरसिंग सूर्यास (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हतेश रविवारी सायंकाळी चाकण येथील विशाल गार्डन जवळ असलेल्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत होते. यावेळी आरोपींनी ‘तू आमच्याकडे का बघतोस’ असे म्हटल्याच्या कारणावरून हतेशला शिवीगाळ केली. निखिल याने हतेश यांना हाताने व लाथेने मारले. अमरसिंग याने दगडाने मारले. तर अन्य आरोपींनी हाताने मारहाण करून दमदाटी केली. यामध्ये हतेश गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.