BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : कार्यालयातून बाहेर नेत महावितरण अधिका-याला मारहाण

एमपीसी न्यूज – महावितरण अधिकाऱ्याचे कार्यालयातून अपहरण केले. त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

विक्रांत माधव वरूडे (वय 37, रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी) असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वैशाली भालेकर, तिचे पती आणि ज्ञानेश्‍वर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूडे हे महावितरणमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी वैशाली यांचे पती व भाऊ जाधव हे वरुडे यांच्या कार्यालयात आले. त्यांना कार्यालयाबाहेर नेले. मी वैशाली भालेकरचा नवरा आहे. तू माझ्या पत्नीला फोन आणि व्हॉटस्‌ऍप मेसेज का करतो? अशी विचारणा करीत शिवीगाळ व हाताने मारहाण केली.

ज्ञानेश्वर जाधवने शिवीगाळ करत वरुडे यांना मोटारीत बसवून त्यांना मोशी येथील एमएसइबी कार्यालयात नेले. त्याठिकाणी वैशाली यांच्यासह दोघांनी शिवीगाळ करत पुन्हा मारहाण केली.  तुझ्या घरच्यांसमोर तुझी इज्जत काढतो, असे म्हणत फिर्यादी यांना मोटारीतून त्यांच्या घरी नेले. तसेच वरुडे यांच्या आई व वहिणीसमोर पुन्हा त्यांना हाताने व काठीने मारहाण करून धमकी देऊन निघून गेले. निगडी ठाण्याचे फौजदार संदीप ओव्हाळ अधिक तपास करत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3