Bhosari : पादचा-याला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – पादचारी तरूणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल, रोकड असा 8 हजार 100 रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना बुधवारी रात्री पावणेआठ वाजता भोसरीतील मोहननगर येथे घडली.

श्रीकांत पांडूरंग मोटे (वय 27, रा. मोहननगर, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी श्रीकांत बुधवारी रात्री मोहननगर येथून रस्त्याने जात होता. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडवून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल, रोकड, बॅग असा 8 हजार 100 रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. फौजदार हंडाळ तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.