Chakan News : शिवीगाळ करू नका म्हणणाऱ्यास कु-हाडीने मारहाण

एमपीसी न्यूज – मोठमोठ्याने शिवीगाळ करत असलेल्या एकाला शिवीगाळ करू नका म्हटल्याने त्याने कु-हाडीने मारले. त्यात शिवीगाळ करू नका म्हणणा-या व्यक्तीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी खेड तालुक्यातील भोसे गावात घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुनीत सुनील ओव्हाळ (वय 33, रा. भोसे, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय भागुजी ओव्हाळ (वय 56, रा. भोसे, ता. खेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी दुपारी एक वाजता भोसे गावातील समाज मंदिरासमोर उभे होते. त्यावेळी आरोपी मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला शिवीगाळ करू नका, असे म्हटले. त्यानंतर फिर्यादी चालत त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यावेळी आरोपी कु-हाड घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात कु-हाडीने मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.