Chakan : चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावण्यावरुन तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावलेल्या तरुणाला दोघांनी मारहाण केली. तसेच त्याला कोयत्याने मारण्याची धमकी दिली. ही घटना खराबवाडी मधील धाडगे आळीमध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी एकच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

शाम नामदेव पवार (वय 22, रा. नाणेकरवाडी, चाकण. मूळ रा. महान पिंजर, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अकबर नजीर काझी, अजमुद्दीन नजीर काझी (धाडगेआळी, खराबवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे चाकण परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी शनिवारी धाडगेआळी मध्ये भाजीपाल्याचे दुकान लावले. त्यांच्या दुकानाच्या शेजारी आरोपी काझी याचे चिकनचे दुकान आहे. चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावायचे नाही. असे म्हणत अकबर याने पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच अजमुद्दीन याने ‘तू जर इथे दुकान लावले, तर तुला सोडणार नाही.’ असे म्हणत कोयत्याने मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.