Dighi : सिगारेटचे पैसे मगितल्यावरून पान टपरीवरील कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – ग्राहकाने पान टपरी वरील कामगाराकडे सिगारेट मागितली. कामगाराने सिगारेट दिली आणि सिगारेटचे पैसे मागितले, यावरून चिडलेल्या तरुणांनी पान टपरीवरील काम करणा-या कामगाराला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास भाऊ पान शॉप, ममता चौक दिघी येथे घडली.

कुणाल किशोर थुल (वय 21, रा. विजयनगर कॉलनी, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण कदम, अजय साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील ममता चौकात भाऊ पान शॉप आहे. या दुकानात कुणाल पान बनविण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास किरण आणि अजय टपरीवर आले. किरण याने कुणालकडे सिगारेट मागितली. कुणालने सिगारेट दिली आणि सिगारेटचे पैसे मागितले. पैसे मागितल्याचा रागातून किरण याने ‘मला पैसे मागतो, मला ओळखत नाही का, थांब तुला बघतो’ असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर अजय याने कुणालच्या हातावर बियरची बाटली फोडली. यामध्ये कुणाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दोन्ही आरोपींना दिघी पोलिसांनी बुधवारी (दि. 22) अटक केली आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एम एच बढेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.