Chakan : मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणा-या महिलेसह मुलीला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणा-या महिलेला आणि तिच्या पीडित मुलीला पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राहुल धर्मा भालेकर (वय 18), योगेश प्रकाश वतंबे (वय 18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अटक आरोपींसह अर्जुन लक्ष्मण येरकर, सविता लक्ष्मण येरकर, राधाबाई भालेकर (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेची पीडित अल्पवयीन मुलगी शाळेला जाता-येता  तिचा पाठलाग केला. तिला अश्लील बोलून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी महिला आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेल्या असता सर्व आरोपींनी त्यांना व त्यांच्या पीडित मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.