Bhosari Crime News : किरकोळ कारणावरून घर मालकाला मारहाण; भाडेकरूसह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घर मालकाची आणि भाडेकरूची भांडणे झाली. ती भांडणे सोडविण्यासाठी घर मालकाचा भाऊ आला. भाडेकरूने घर मालकाच्या भावाला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेअकरा वाजता रोषण गार्डन मागे भोसरी येथे घडली.

प्रशांत बिजवे (वय 23, रा. रोषण गार्डन मागे, भोसरी) आणि त्याचे दोन ते तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष केशवराव फुलारी (वय 35, रा. रोषण गार्डन मागे, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ संदीप फुलारी यांनी त्यांची कार रोषण गार्डनच्या मागे पार्क केली होती त्यावेळी आरोपी भाडेकरू प्रशांत बिजवे आणि फिर्यादी यांच्या भावाचा वाद झाला. ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारले. शिवीगाळ केली. यात फिर्यादी जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.