Sangvi Crime : पूर्ववैमनस्यातून चुलत मेव्हण्याला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चुलत मेव्हण्याला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये 16 वर्षीय चुलत मेव्हण्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री दहा वाजता साद बेकरी, पिंपळे गुरव येथे घडली.

यश सचिन चव्हाण (वय 16, रा. पिंपळे गुरव) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार अडागळे (रा. हडपसर), कमलेश अडागळे, चिंटू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), राहुल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश हा आरोपी तुषार याचा चुलत मेव्हणा आहे. त्यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी ‘तुला मस्ती आली आहे का’ असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. राहुल याने दगडाने तर कमलेश याने लाकडी फळीने मारून यशला गंभीर दुखापत केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.