Dighi : कौटुंबिक कारणावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात तरुणास चार जणांनी लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. ही घटना दिघी येथे 27 जानेवारी रोजी घडली.

राजकुमार साहेबराव दिवटे (वय 35, रा. पेठगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि. 15) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तात्रय ज्ञानदेव शिंदे (वय 29, रा. चौधरी पार्क, दिघी), नीलेश शिवाजी रंधवे (वय 28, रा. गायकवाड नगर, दिघी), विकी पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि पप्पू नामदेव शिंदे (वय 27, रा. कात्रज, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोसिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी फिर्यादी दिवटे हे माहेरी आलेल्या आपल्या पत्नीला नेण्यासाठी दिघी येथे आले होते. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून कौटुंबिक कारणावरून फिर्यादी यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण करून गंभीर जखमी केले. महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.