Crime News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

एमपीसी न्यूज – दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून (Crime News) पायाच्या नडगीवर मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला आहे.हि घटना मांरुजी येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकाश राजू कवडे (रा. मारुंजी) याला अटक केली आहे.

 

Hinjawadi Crime : अनधिकृत फ्लेक्सबाजी कऱणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती संतोष नवरे यांना आरोपीने दारु पाजण्याची गळ घातली. यावेळी फिर्यादीच्या पतीने पैसे नसल्याने नकार दिला. (Crime News) यावरून चिडून आरोपीने हाताने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली ज्यामध्ये फिर्यादीच्या पतीच्या डोळ्याला मार लागला असून पायाच्या नडगीचे हाड देखील फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.